बिग बॉस

Bigg Boss Marathi Season 5: रक्षाबंधनाच्या दिवशी बिग बॉसच्या घरात भावा-बहिणीत उडणार वादाचे खटके

निक्की आणि घनःश्याम या दोघांमध्ये वादाचे खटके उडताना पाहायला मिळणार आहे. यांची एक झलक बिग बॉसच्या सोशल मीडिया पोस्टवर पाहायला मिळत आहे.

Published by : Team Lokshahi

बिग बॉस मराठी 5 सुरु होताच चर्चेत येताना दिसला. बिग बॉस मराठी 5 मधील स्पर्धक आणि त्यांच्यातील वाद हे बिग बॉस मराठी 5 ला चर्चेत आणू लागले. यावेळेस बिग बॉसच्या सिजनमध्ये पहिल्या आठवड्यातचं भांड्याला भांड लागताना पाहायला मिळालं. यादरम्यान सर्वात गाजलेलं भांडण हे निक्की निक्की तांबोळी आणि मराठी स्टार वर्षा उसगांवकर या दोघींचे होते. निक्कीच पहिलं भांडण हे मराठी चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेत्री वर्षा उसगांवकर हे होत. त्यानंतर तिच अनेक जणांसोबत बिनसलेल दिसल. वर्षा उसगांवकर यांच्यासोबत झालेल्या भांडणात निक्की मात्र सोशल मीडिया यूजर्सद्वारे ट्रोल होताना दिसली. कलर्स मराठीवरील बिग बॉसचा प्रेक्षकवर्ग दिवसें-दिवस वाढतचं चाललेला पाहायला मिळत आहे.

यानंतर बिग बॉसमध्ये झालेल्या भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुखने निक्कीची शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं, हे सगळ सुरु असताना निक्की आणि घनःश्याम या दोघांमधील जवळीक वाढू लागली होती. त्यामुळे सोशल मीडियावर दोघेही मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील होत होते. यांच्यातील मैत्री अधिक जुळू लागली होती आणि आता अशातचं या दोघांमध्ये वादाचे खटके उडताना पाहायला मिळणार आहे. यांची एक झलक बिग बॉसच्या सोशल मीडिया पोस्टवर पाहायला मिळत आहे.

ज्यामध्ये दोघे ही एकामेकासोबत वाद घालताना दिसत आहेत. यादरम्यान घनःश्याम निक्की समोर उभा असताना निक्की घनःश्यामला "तु फेक आहेस" असं म्हणत हिनवलेलं पाहायला मिळाल. यावर प्रत्युत्तर देण्यासाठी घनःश्याम पुढे येत म्हणाला," काय फेक आहे सांग तू, तू किती होपलेस आहेस हे अख्या जनतेला दिसत आहे. तुला मी सख्या बहिणीचा दर्जा दिला". यावर निक्की ओरडत म्हणाली "नको देऊ, याचसोबत निक्की म्हणाली भावाच्या नावाला डाग आहेस तू". तर यावर घनःश्याम म्हणाला "निक्की ताई म्हणत होतो आणि घात केला तू". यांच्या या भांडणाचा कोणाला फायदा होणार आणि हे भांडण खरचं आहे की नाही असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे. आता पुढे या दोघांच्या वादाला आणखी ठिणगी लागणार की हे भांडण इथेच शांत होणार याकडे आता सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी